आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक ,
दई ठेवूनि ते कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
तयाची टिक टिक चालते न कधीही , आहे मुके वाटते ,
किल्ली दई न तयास ती कधी, तरी ते सारखे चालते
" अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे राती बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कु ठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोबडा, उठ की !"
ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनीया सकाळ न मुळी पत्ता कधी लागता !
"आली ओटीवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानी तो घणघणा घंटा ध्वनी आदळे.
खेळाचया अगदी भरांत गढुनी जाता आम्ही अंगणी
हो केव्हा तीनसांजा ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले "खेळ पुरे , घरातं परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"
आजीला बिलगून ऐकत बसु जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात की रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतीवरी वाजावया चौघडा
सांगे वेळ, तशाच वार- तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारे तिला तयातुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले ?
गाठोडे फडताळ शोधुनी तिचे आलो ! तरी ना मिळे !
अरे सही!
ReplyDeleteखुपच छान वाटलं वाचून. धन्यवाद.
पण काही चुका राहिल्यात:
जममत जम्मत
बिछ्यान्यावरी बिछान्यावरी
घडाळातुनी घड्याळातुनी
धन्यवाद ! चुका दुरुस्त केल्या आहेत :)
Delete