तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप, तीच तूही कामिनी नीरवता ती तशीच, धूंद तेच चांदणे छायांनी रेखियले, चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहीनी एकांती मज समीप, तीच तूही कामिनी सारे जरी ते तसेच, धुंदी आज ती कुठे मी ही तोच, तीच तूही, प्रीती आज ती कुठे ती न असता उरात, स्वन ते न लोचनी एकांती मज समीप, तीच तूही कामिनी त्या पहिल्या प्रीतीच्या, आज लोपल्या खुणा वाळल्या फुलात व्यर्थ, गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून, भंगल्या सुरातुनी एकांती मज समीप, तीच तूही कामिनी
- शान्ता शेळके
संगीतकार,गायक:सुधीर फडके.
