Saturday, January 31, 2009

पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा

पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा

मी बाई फुलराणी, गाईन सुंदर गाणी
फुले भरा भरा वेचा, आता खेळा नाचा

फूलपाखरू आले, मला हळूच म्हणाले
“तू राजा रानाचा !”, आता खेळा नाचा

कानी सुंदर डूल, तसे डुलते फूल
झुले झुला पानाचा, आता खेळा नाचा

थेंब दवाचे करती, चमचम गवतावरती
नजराणा किरणांचा, आता खेळ नाचा

- मंगेश पाडगांवकर

2 comments:

  1. सही!!
    शाळेत प्रतेक पुस्तका मधे ही पविता असावी..

    ReplyDelete
  2. फक्त शाळेतच का ? आत्ता सुद्धा प्रत्येका पुस्तकात असावी :)

    ReplyDelete