हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!
केले न बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!
आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा..सारे उगाळलेले ते कोळसेच होते!
तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही!तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!
होती न ती दयाही.. ती जाहिरात होती!जे प्रेम वाटले ते माझे हसेच होते!
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.मातीत पावलांचे काही ठसेच होते!

-सुरेश भट
No comments:
Post a Comment