ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरुन मेघ आले डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची डोहाळे या मातीला, सूर बोले थेंबातला वाटा आता कस्तुरी, गंध उमले कोंबातला थरारे मन, वारे नविन, सृजन रंग न्हाले स्वप्न लहरे नवे कांचनी, धून हरवे रानातूनी राधिका झाली बावरी, जन्म लहरे मुरलीवरी तृप्ती निराळी, उजळीत डोळी, स्वर हे कुठून आले हरपून दाही दिशा, ओढाळ झाल्या कशा शिणगार करती ऋतू, प्रीत स्पर्शात जाई उतू अभिसार न्यारा, हळवा शहारा, अरुपास रुप आले
- शान्ता शेळके गायिका : अनुराधा पौडवाल संगीत : श्रीधर फडके
No comments:
Post a Comment