त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का ? त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का ? त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का ? गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का ? मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ? वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का ? जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ? आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का ? जीवनी संजिवनी तू, माऊलीचे दूध का ? कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का ? मूर्त तू मानव्य का रे, बालकांचे हास्य का ? या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का ?
- सुर्यकांत खांडेकर
संगीत / गायक : हृदयनाथ मंगेशकर.
गाणे येथे ऐका ..