असा दरवळे मी तुझ्या भोवताली
लपेटून साऱ्या तुझ्या हालचाली
असा दरवळे मी तुझ्या भोवताली २
तुझा चेहरा झगमगे अंतरीया २
जसा चांदवा अंबराच्या महाली २
लपेटून साऱ्या तुझ्या हालचाली
असा दरवळे मी तुझ्या भोवताली २
जरा धीर आला तिच्या बोलण्याने ३
तिची लाज माझी धिटाई निघाली २
लपेटून साऱ्या तुझ्या हालचाली
असा दरवळे मी तुझ्या भोवताली २
नवे सूर त्यांनी दिले पावसाला ३
तिची पैंजणे ज्या सरींना मिळाली २
लपेटून साऱ्या तुझ्या हालचाली
असा दरवळे मी तुझ्या भोवताली २
गीत : अवधूत गुप्ते
संगीत : मयुरेश पै